महात्मा बसवेश्वरांचे मानव समाजासाठी केलेले योगदान

प्रा. डॉ. सोमगोंडे निंगप्पा सिद्राम
2022 Zenodo  
प्रस्तावना - कर्नाटक भूमी बसवेश्वरांच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले आहे बाराव्या शतकात बसवेश्वरांनी जे क्रांतिकारक कार्य केले आणि त्या कार्याला ची वैचारिक बैठक पुरवली तिचा उहापोह बसवेश्वरयांनी व्यक्त केलेल्या धार्मिक सामाजिक आर्थिक व राजकीय विचारांच्या अनुषंगाने केलेला आहे समाज प्रबोधन कार्य या अर्थाने बसवेश्वर यांचा अभ्यास केल्यास त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्यांनी उभ्या केलेल्या सामाजिक चळवळीचा आपणास आढावा घ्यावा लागेल. ब्राह्मण कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म होऊनही
more » ... नी वर्णव्यवस्था आणि त्यासंबंधाने अस्तित्वात असलेल्या जातिव्यवस्थेवर आणि जातीव्यवस्थेची संबंधित असलेला श्रेष्ठ-कानिष्ठ्तेच्या पद्धतीवर प्रखर टीकेचे प्रहार केले जाती जातीमधील भेदाची भिंत त्यांनी पाडून समतेच्या मूल्यावर अधिष्ठित असलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सामाजिक चळवळ घडवून आणली प्रबोधनकारांच्या भूमिकेतून त्यांनी धर्माच्या माध्यमातून समाजाचे सामाजिक समतेची शिकवण दिली तिचे महत्त्व आज देखील जाणवते बाराव्या शतकात प्रबोधनाचे साधन धर्मच होता मानवी समूहाला संघटित करणारे आणि मानवी जीवनाची दिशा ठरवणार एक प्रभावी साधन म्हणून धर्म अस्तित्वात आलेला आहे परंतु कालौघात धर्म हेच मानवी जीवनाचे ध्येय झाले धर्मासाठी माणूस आणि धर्माच्या अस्तित्वासाठी माणूस हा विचार रूड झाल्यानंतर धर्माच्या अस्तित्वाच्या संदर्भातच मानवी अस्तित्वाचा शोध देण्या घेण्याचा प्रयत्न धर्ममार्तंडांनी सुरू केला त्याचा हिंसात्मक अविष्कार धर्मासाठी युद्ध धर्मासाठी लढली गेलेली युद्धे ही वस्तुतः माणुसकीच्या मूल्याचा प्रेतावरून निघालेली धर्माचे मिरवणूक असल्याचे इतिहासच सांगतो.
doi:10.5281/zenodo.7053680 fatcat:e2tn5on5avfhthelkx5wzvlrnu