नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतातील सेंद्रिय शेती

प्रा. डॉ. यशवंत कोंडाजी चौधरी
2023 Zenodo  
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन भारत, नवीन अपेक्षा, नवीन आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी देखील एक शक्तिशाली माध्यम आहे. त्यामागे चार-पाच वर्षांचे कठोर परिश्रम, प्रत्येक क्षेत्रातील लोक, प्रत्येक शाखा, प्रत्येक भाषेने रात्रंदिवस कार्य केले आहे. परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता खरी कामे सुरू झाली आहेत. आता आपल्याला प्रभावी पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. आणि आपण हे काम एकत्र करू. मला माहित आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर आपल्यातील बर्‍याच जणांच्या मनात बरेच
more » ... ्न येत आहेत. हे शिक्षण धोरण काय आहे ? हे कसे वेगळे आहे ? यातून शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थेत काय बदल होईल ? या शिक्षण धोरणात शिक्षकासाठी काय आहे? विद्यार्थ्यांसाठी काय आहे ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काय करावे, कसे करावे ? हे प्रश्न बरोबर आहेत आणि आवश्यक देखील आहेत. भविष्यातील शेती व शेती संलग्न उद्योग-व्यवसाय हेच कृषी विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन मिळवून देऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे ज्ञान व कौशल्य देण्याची गरज तसेच प्रेरणा देणारे कृषी शिक्षण अपेक्षित आहे. शेतीचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. कमी जमीन धारणेत जास्तीत जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी शेती आता करावी लागेल. काटेकोर शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती, उच्चतंत्र शेती असे अनेक प्रकार शेतीला ऊर्जा देणारे आहेत. यासोबतच शेतीपूरक विषय जसे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, रेशीम शेती अशा अनेक व्यवसायक्षम बाबी महत्त्वाच्या आहेत. या सर्व विषयाचा अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने समावेश करावा लागणार आहे. कृषी शिक्षण काळानुरूप बदलणे अपेक्षित आहे, पण तसे फार होताना दिसत नाही. कृषी व संलग्न विषयातील शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी भविष्याविषयी आत्मविश्‍वास घेऊन बाहेर पडतील, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी प्रस्तुत संशोधन लेखात करण्यात आला आहे.
doi:10.5281/zenodo.7663456 fatcat:iznp4icebvhi3eij76mk4anqwm