कोरोना, टाळेबंदी आणि स्थलांतरीत मजुरांची मनस्थिती

प्रा. किरण नाईकनवरे
2022 Zenodo  
कोरोना विषाणुमुळे संपूर्ण जगभरात आर्थिक, सामाजिक, मानसिक परिवर्तने घडून येतील अशी स्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुचा वाढता उद्रेक पाहता या विषाणुची संसर्ग साखळी तोडण्याच्या हेतूने भारतात शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली आणि गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन यावेळी केले होते. याचा जोरदार फटका सर्व क्षेत्रांना बसला. मग ते लघु उद्योग असो किंवा मध्यम उद्योग असो. सर्व व्यापार, व्यवसाय, कारखाने, शेती, बँकिंग क्षेत्रातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प
more » ... े. अचानक झालेल्या या टाळेबंदीमुळे काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. तर काहींचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. शाळा, महाविद्यालये, हॉटेल, सिनेमागृहे, अनेक छोटे मोठे व्यवहार बंद झाले. अनेकांना कुटुंबियांसमवेत भरपूर रिकामा वेळ मिळाला तर अनेकांचा वेळ कुटुंबातील सर्व सदस्य घरात असताना घर कामात जाऊ लागला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक व नकारात्मक असे बदल घडून आले. मात्र शासनाने भारतात केलेल्या टाळेबंदीच्या या घोषणेमुळे शहरी भागांतून ग्रामीण भागांकडे हजारो लाखो मजुरांच्या स्थलांतराला चालना मिळाली. या स्थलांतरीत मजुरांमध्ये स्वयंरोजगार, असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर, कंत्राटी मजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर अधिक प्रमाणात होते. ज्यांना शासनामार्फत कोणत्याही शासकीय सुविधा प्राप्त होत नाही. एका रात्रीत हे मजूर बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले. कोरोना विषाणुच्या संकटाची व टाळेबंदीची झळ या स्थलांतरीत मजुरांना अधिक प्रमाणात सोसावी लागली. टाळेबंदीत या मजुरांची उपासमार सुरु झाली. पुढे जगायचे कसे? या प्रश्नामुळे त्यांच्या मनात भीतीची आणि चिंतेची भावना उफाळून आली. परिणामी हे मजूर आपल्या मुळगावी परतण्यासाठी पायी निघाले
doi:10.5281/zenodo.6990682 fatcat:5jpufsbdnvdafg67amercxpjri